बांगलादेशात सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने साखरेची विक्री

ढाका : बांगलादेशमध्ये सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा जास्त दराने साखरेची विक्री सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भर पडत आहे. सध्यस्थितीत साखरेची किरकोळ विक्री सरकारकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा Tk११ प्रती किलो जास्त दराने विक्री केली जात आहे. २२ सप्टेंबर रोजी सरकारने खुल्या साखर विक्रीसाठी साखरेचा किरकोळ दर Tk८४ आणि पॅकिंग केलेल्या साखरेचा दर Tk८९ प्रती किलो निश्चित केला होता. मात्र, याची विक्री अनुक्रमे Tk९५ प्रती किलो आणि Tk१०० प्रती किलो दराने सुरू आहे. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ साखरेच्या किमती घाऊक आणि किरकोळ स्तरावर तेजीत आहेत.

गुरुवारी, २० ऑक्टोबर रोजी खातूनगंजच्या घाऊक बाजारात साखरेचा दर Tk३,५५० प्रती मण (३७.३२ किलो) होता. दोन आठवड्यापूर्वी हा दर Tk3,२५० होता. म्हणजेच या कालावधीत या आवश्यक उत्पादनाच्या घाऊक दरात Tk३०० प्रती मण अथवा Tk८ प्रती किलोची वाढ झाली आहे. सिटीग्रुपचे उप महाव्यवस्थापक (बिक्री) प्रदीप करण यांनी सांगितले की, हे खरे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर तोट्यात आहेत. ते म्हणाले की, साखरेवरील नियामक शुल्क पहिल्यापेक्षा २० टक्क्यांवरून वाढून ३० टक्के झाल्याने आमचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती घटवणे शक्य नाही. सद्यस्थितीत देशाची साखरेची वार्षिक मागणी जवळपास १८-२९ लाख टन आहे. पूर्वी देशाच्या मालकीचे कारखाने १.५ लाख ते २ लाख टन साखर उत्पादन करीत होते. मात्र, गेल्या दोन वर्षात १५ सरकार कारखान्यांपैकी सहा कारखान्यांचे उत्पादन बंद झाले आहे. आणि उत्पादन क्रमशः ४८,००० टन आणि २५,००० टनापर्यंत घसरले आहे. त्यामुळे देशातील साखर उत्पादन पूर्णपणे खासगी कारखान्यांवर अवलंबून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here