Pancarbo Greenfuelsची इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना

भटिंडा : पंकारबो ग्रीनफ्यूल्सने (Pancarbo Greenfuels) पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात लेहरी गावात २५० KLPD क्षमतेचे धान्यावर आधारित इथेनॉल युनिट सुरू करण्याची योजना तयार केली आहे.

याबाबत Projects Today मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युनिटमध्ये सहा मेगावॅटचा सह वीज प्रकल्पाचाही यामध्ये समावेश असेल. इथेनॉल युनिट योजनेला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEF&CC) हिरवा झेंडा दर्शविला आहे. ताज्या अपडेट नुसार, प्रकल्पाच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. ही योजना मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here