हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
फर्निचर, कागद निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उसाच्या चिपाडापासून आता फूड पॅकिंगही केले जाणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या जेवणासाठी हे फूड पॅकिंग वापरले जाणार आहे. यावर्षी जून महिन्यापासून आयआरसीटीसीच्या रेल्वेतील जेवणासाठी हे पॅकिंग वापरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संदर्भात आयआरसीटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या रेल्वेमध्ये देण्यात येणारे जेवण हे अॅल्युमिनिअम फॉइल पेपरमधून देण्यात येते. एका सर्वेक्षणात त्यात घातक केमिकल्स असल्याचे आढळून आले. गरम जेवणात त्या केमिकलचा अंश येत असल्याचे दिसले. अर्थातच आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. या केमिकलमुळे जेवणाला दुर्गंधी येण्याचाही धोका असतो. उसाच्या चिपाडापासून तयार केलेल्या पॅकिंगमध्ये असा कोणताही धोका आढळत नाही.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिपाडापासून फूड पॅकिंग बनवल्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. यापूर्वी शेतकरी अशी चिपाडे फेकून देत होते किंवा त्याला आग लावली होती. पण, आता रेल्वे उसाची चिपाडे विकत घेऊन त्याची उपयुक्तता सिद्ध करणार आहे. या संदर्भात रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार म्हणाले, ‘जूनपर्यंत रेल्वेमध्ये उसाच्या चिपाडापासून तयारी केलेली फूड पॅकेट्स देण्याला सुरुवात होईल. यात प्रवाशांच्या आरोग्याचाही विचार करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे.’
या रेल्वेंमध्ये होणार सुरुवात
– बिहार संपर्क क्रांती एक्स्पेस
– श्रमजीवी एक्स्प्रेस
– राजधानी एक्स्प्रेस
– संपूर्ण क्रांती एक्स्प्रेस
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp