शेतकऱ्यांमध्ये जागरुकतेसाठी ऊस शेतकरी महाविद्यालयाचे विद्यार्थी सरसावले

पूरनपूर : जबाबदार यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे विभागात शेतांमध्ये पाचट जाळण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीतील खतांची मात्रा घटण्यासह पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ऊस महाविद्यालयातील विद्यार्थी सरसारवले आहेत. यासाठी पथके स्थापन करण्यात येत आहेत. विद्यार्थी शेतकऱ्यांमध्ये पाचट जाळू नये यासाठी आवाहन करतील. पाचट जाळून होणाऱ्या नुकसानीबाबतही माहिती दिली जाणार आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रशासनाकडून भाताचे अवशेष जाळण्यावर निर्बंध आहेत. तरीही पुरनपूर आणि कालीनगर तालुक्यात पाचट टाळले जात आहे. प्रशासन उदासिन असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत ऊस कृषी पदव्युत्तर महाविद्यालयात उपजिल्हाधिकारी आशुतोष गुप्ता यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांची बैठक घेतली. प्राचार्य डॉ. सुधीर शर्मा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सहाय्याने याबाबत जनजागृती केली जाईल. कार्यक्रम अधिकारी शाहीद खान यांना तयारीबाबतचे निर्देश देण्यात आले. अभयपुर माधोपूर, पिपरिया मझरा, घाटमपुर, अमरैया खुर्द, पिपरिया दुलई, सुआबोझ, सिरसा, केशौपुर, निजामपुर, बिलंदपुर अशोक, कजरी निरंजनपुर, रंपुरा कोन यांसह अठरा गावांसाठी विद्यार्थी समिती स्थापन करण्यात आली आहे. बैठकीला आशुतोष दीक्षित, गरिमा शर्मा, अमित, संध्या देवी, मधु आर्य, मान्य त्रिवेदी, रोली देवी, विकास, मनोज, अंकित, शिवम आदींसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here