एक क्लिकवर उघडणार उसाची ‘कुंडली’

बिजनौर : ऊस विभागाने उसाचा सर्व तपशील स्मार्ट गन्ना किसान (ईआरपी) च्या वेबसाइट तथा मोबाइल अॅपवर अपलोड केला आहे. शेतकरी घरबसल्या आपल्या अँड्रॉईड मोबाईलवर अथवा लॅपटॉप तसेच जनसुविधा केंद्रावर तोडणी पावती, उसाचे क्षेत्रफळ, तोडणीचे वेळापत्रक अशी माहिती मिळवू शकतात. या माहितीसाठी त्यांना ऊस समिती कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील चार साखर कारखाने २८ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करणार आहेत. ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. ऊस विभागाने समितीनिहाय तोडणी कार्यक्रमादरम्यान तक्रारींचे निराकरण करून स्मार्ट गन्ना किसान (ईआरपी)च्या वेबसाईट केन यूपी डॉट इन तसेच मोबाइल अॅप ई-गन्ना वर माहिती अपलोड करण्यात आली आहे. आता शेतकरी सहजपणे आपल्या स्मार्टफोनमधून तसेच जनसुविधा केंद्रातून माहिती देऊ शकतात. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि तक्रारींच्या सोडवणुकीसाठी मुख्यालयात कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. शेतकरी टोल फ्री क्रमांक १८००-१२१-३२०३ वर थेट संपर्क साधू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here