सोलापूर: ऊस दरवाढीचे आंदोलन तीव्र, कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या चाकांतील हवा सोडली

सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या ११ टायरमधील हवा सोडली. शेतकऱ्यांनी ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान, त्यांनी साखर कारखान्याला ऊस नेणाऱ्या वाहनांच्या चाकांमधील हवा सोडली. सरकारने आपल्या मागण्यांकडे लक्ष देवून त्याची सोडवणूक करावी अशी मागणी करण्यात आली. तर पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री वाखरी येथे अज्ञातांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या ११ चाकांची हवा सोडली. मात्र, ट्रॅक्टर मालकांनी या प्रकरणी तक्रार नोंदवलेली नाही.

पत्रिकामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या झेंड्याखाली विविध शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या उसाची खरेदी २१०० ते २३०० रुपये प्रती टन दराने केली जाते. हा दर वाढवून ३१०० रुपये केला जावा, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांनी ऊस साखर कारखान्याला पाठवू नये आणि वाहतूकदारांनी आपल्या वाहनांतून त्याची ने-आण करू नये, असे आवाहन संघटनेने केली आहे. सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केला. आंदोलन चिघळण्यापूर्वी सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here