नांदेड : नांदेड विभागात २०२२-२३ या हंगामात ३० साखर कारखाने सुरू होतील. यामध्ये २० खासगी तर १० सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. विभागातील चार जिल्ह्यांमध्ये एक लाख ६३ हजार ६८० हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ३० कारखाने सुरू होणार आहेत. यामध्ये १० सहकारी साखर कारखाने तर त्याच्या दुप्पट म्हणजे, २० खासगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागाचा गळीत हंगाम २५ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.
महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून १० ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने ऊसाचे गाळप सुरू होईल अशी अपेक्षा आहे. राज्यात दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून गळीत हंगामाला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा पावसाने गाळपास उशीर झाला आहे.