बांगलादेशमध्ये साखर आयातीवरील नियामक शुल्कात कपातीची मागणी

साखर आयातीवरील नियामक शुल्क ३० टक्क्यांवरून घटवून १० टक्के केल्यास देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती स्थिर होऊ शकतात, असे Bangladesh Trade and Tariff Commission (BTTC) च्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

BTTC ने अलिकडेच वाणिज्य मंत्रालयाला आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये देशातील साखरेची मागणी, स्थानिक उत्पादन, आयात, सध्याचा साठा आणि आयात प्रक्रिया यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

देशातील विविध साखर रिफायनरींमध्ये १.५४ लाख टन कच्च्या साखरेचा साठा आहे. तर इतर २.२१ लाख टन साखर आयातीच्या प्रतीक्षेत आहे. यातून स्थानिक मागणी पूर्ण करणे शक्य आहे.

कमी होणाऱ्या पुरवठ्यादरम्यान, Bangladesh Sugar Refiners Association ने २० ऑक्टोबर रोजी सरकारकडून प्रक्रिया न केलेल्या साखरेवरील (unrefined sugar) सर्व प्रकारचे आयात शुल्क हटविणे आणि वाणिज्य बँकांना कोणत्याही निर्बंधांशिवाय अशा प्रकारे आयातीसाठी कर्ज पत्र ( letters of credit) देण्याबाबत परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here