Sugar export: DGFT कडून साखर निर्यातीवरील निर्बंधांत ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढ

विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) साखर निर्यातीवरील निर्बंध एक वर्षासाठी वाढवले आहेत. याबाबत DGFT कडून जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार, “केंद्र सरकार HS कोड १७०१ १४ ९० आणि १७०१ ९९ ९०च्या अंतर्गत साखर (कच्ची साखर, प्रक्रिया केलेली साखर आणि सफेद साखर) च्या निर्यातीवरील निर्बंधांची मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ पासून पुढे ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे. अथवा पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू असतील.

हे निर्बंध सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत EU आणि USA ला निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर लागू नाहीत. इतर अटी मात्र जैसे थे राहणार आहेत.

साखरेची देशांतर्गत उपलब्धता आणि दरात स्थिरता ठेवण्यासाठी, सरकारने १ जून २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here