हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
लखमीपूरखिरी (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
साखर कारखान्यांकडून ऊसाची बिले वेळेवर न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बीएचएल कारखान्याकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंतची बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होळीचा रंगही फिका झाला आहे.
कारखान्याकडून ऊस बिले देण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांकडून होणारी आर्थिक उलाढाल थांबली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. शेतकऱ्यांकडून होणारी बाजारातील खरेदी-विक्री थंडावली आहे. साखर कारखान्यांना पुरवठा केलेल्या ऊसाची बिले वेळेवर दिली जात नसल्याने आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. मात्र, यंदा तसे झाले नाही. कारखान्याने ऊस बिले न दिल्याने सणाच्या निमित्ताने होणारी खरेदी अत्यल्प झाली आहे. त्यामुळे कारखान्याने प्रलंबित ऊस बिले तातडीने अदा करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp