चंदीगढ : जानेवारीमध्ये तापमानात अचानक वाढ आणि जोरदार पावसामुळे या वर्षाच्या सुरुवातीला, गव्हाच्या उत्पादनात घसरण झाली. आणि त्यामुळे पंजाब कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत गव्हाची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पंजाब कृषी विद्यापीठाचे (पीएयू) कुलगुरू डॉ. सतबीर सिंह गोसल यांनी शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत गव्हाचे पेरणी करण्यास सांगितले आहे. कारण, त्यामुळे गव्हाचे उत्पादन अधिक मिळेल. पंजाबमध्ये गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पिक आहे. जवळपास ३५ हजार हेक्टरमध्ये याची शेती केली जाते.
गोसल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यात अचानक किमान तापमान २.१ ते ६.६ डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान २.५ ते ६.० डिग्री सेल्सिअसच्या वाढीमुळे गव्हाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यांनी सांगितले की, या तापमानामुळे पिक लवकर पक्व झाले. त्यामुळे धान्य बारीक झाले. आणि पिकाचे जवळपास १० टक्के नुकसान झाले. PBW ८२६, PBW ८२४, PBW ७६६ (सोनेरी) आणि PBW ७२५ यांसारख्या गव्हांच्या प्रजाती हवाान बदलाशी जुळवून घेतात. मुख्य कृषी शास्त्रज्ञ (गहू) डॉ. हरि राम यांनी सांगितले की, नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा ही गव्हाच्या पेरणीस योग्य वेळ आहे. प्रायोगिक संशोधनातून दिसून आले की, १५ नोव्हेंबरनंतर गव्हाच्या पेरणीस उशीर झाल्यास दर आठवड्याताल १.५ क्विंटल प्रती एकर उत्पादनात घट येते.