ढाका : देशभरात साखरेची साठेबाजी केली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बाजारातील साखरेचा पुरवठा कमी झाल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. सिटी ग्रुपचे कॉर्पोरेट आणि नियामक व्यवहारांचे संचालक बिस्वजीत साहा यांनी दावा केला की, देशातील सर्व कारखानदार बाजारपेठेत दररोज ४५००-५००० टन साखरेचा पुरवठा करीत आहेत. आणि साखरेच्या पुरवठ्यात कोणताही तुटवडा नाही. ते म्हणाले की, कारखान्यांकडून ट्रकमधून ९५ रुपये प्रती किलो साखर विक्री केली जात आहे. मात्र, व्यापारी ग्राहकांकडून TK१२० प्रती किलो वसूल करीत आहेत.
राष्ट्रीय ग्राहक अधिकार संरक्षण संचालनालयाने अलिकडेच एका व्यापाऱ्यावर अवैध रुपात साखर साठवल्याबद्दल ५० हजार TK चा दंड लावला होता.
डीएनसीआरपी राजशाही मंडल कार्यालयाचे उपसंचालक मोहम्मद सलीम यांनी सांगितले होते की, आपल्या नियमित कामकाज, बाजारावर लक्ष ठेवण्याच्या कामादरम्यान, त्यांनी राजशाहीमधील साहेब बाजार बोरो मस्जिद परिसरातील एका गोदामावर छापा मारला. यामध्ये अवैध पद्धतीने ठेवलेली १३४ पोती साखर जप्त करण्यात आली.
यांदरम्यान, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांचे साखर कारखानदारांपेक्षा वेगळे म्हणणे आहे. कावरा बाजार घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, ते गेल्या एक आठवड्यापासून आपल्या दुकानात साखर ठेवत नाहीत अथवा त्याची विक्री केली जात नाही. ते म्हणाले, जर मला साखर प्रती किलो TK९५ ने खरेदी करावी लागली तर मी काय नफा कमविणार. कारण सरकारने साखरेचा दर प्रती किलो TK९० जाहीर केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छापेमारीच्या भीतीने आम्ही साखर दुकानात ठेवत नाही. याशिवाय, घाऊस व्यापाऱ्यांनी साखर कारखानदारांकडून पुरेशी साखर मिळत नसल्याचा आरोप केला.
साखर कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, देशात साखरेची वार्षिक मागणी २५ टन आहे. तर देशांतर्गत उत्पादन १ लाख टन आहे. सध्या सीटी, मेघना, एस आलम, अब्दुल मोनेम आणि देशबंधू या पाच समुहांकडे जवळपास १.५० लाख टन प्रक्रिया न केलेल्या साखरेचा साठा आहे. याशिवाय, सरकार स्थानिक मागणीनुसार ३.३० लाख टन साखरेची आयात करणार आहे.