लंडन : बँक ऑफ इंग्लंडने गुरुवारी आपल्या प्रमुख कर्जाचा दर ०.७५ टक्के वाढून तीन टक्के केला आहे. गेल्या ३० वर्षांमधील ही सर्वाधिक दरवाढ आहे.
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यामुळे नियंत्रणाबाहेर गेलेल्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि माजी पंतप्रधान लिज ट्रस यांच्या विद्ध्वंसक आर्थिक धोरणांचा परिणाम कमी करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.
ब्रिटनमधील ग्राहक दरावर आधारित महागाई सप्टेंबर महिन्यात ४० वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली होती.
व्याज दरात केलेली वाढ ही बाजाराच्या अपेक्षेनुसार आहे. कारण, असे म्हटले जात होते की, महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी आक्रमक पावले उचलण्याची गरज आहे.