Cuba कडून साखर निर्यातीची योजना स्थगित

हवाना : क्यूबा (Cuba) या महिन्यात देशात वार्षिक पिक कापणीस सुरुवात करीत आहे. मात्र, तज्ज्ञ आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या संकटग्रस्त कॅरेबियन द्वीपकल्पास आपल्या स्वतःच्या वापरासाठीही पुरेशा साखरेचे उत्पादन करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे निर्यातीच्या योजनेत अडथळे येतील. क्युबा सरकारने सांगितले की, यंदाच्या पिक हंगामात ४,५५,००० टन कच्ची साखर उत्पादित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे गेल्या शंभर वर्षातील उत्पादनाच्या निच्चांकी स्तरापेक्षा १४,००० टनाने कमी उत्पादन असेल. साखर उत्पादनातील घसरणीने क्युबाला निर्यात योजना स्थगित करण्याची वेळ आली आहे.

एवढेच नाही तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्युबाने गेल्या वर्षी ब्राझीलकडून काही प्रमाणात साखर आयात केली होती. क्युबामध्ये वार्षिक ६,००,००० ते ७,००,००० टन साखरेचा खप होतो. आणि साखर ४,००,००० टन निर्यात करण्याचा एक दीर्घकालीन करार आहे. इंधन, पुरवठा, स्पेअर पार्ट्स, कर्मचाऱ्यांच्या कमतरता यामुळे हवालदिल ५६ कारखान्यांपैकी फक्त २३ कारखाने या हंगामात उसाचे गाळप करतील. १९८९ मध्ये क्युबामध्ये १०० कारखाने होते आणि ८ मिलियन टन कच्च्या साखरेचे उत्पादन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here