विप्रो, नेस्लेपेक्षाही जादा श्रीमंत आहे तिरुपती मंदिर, अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक नेटवर्थ

तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या संपत्तीसमोर देशातील बड्या-बड्या कंपन्यांचाही टिकावा लागणार नाही. तिरुमाला तिरुपती देवस्थान (टीटीडी) मंदिराच्या संपत्तीची माहिती जाहीर केली आहे. देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, विप्रो, नेस्लेच नव्हे तर ओएनजीसी, आयओसी यांसारख्या कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलपेक्षा अधिक संपत्ती त्यांच्याकडे आहे. जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक नेटवर्थ मंदिराचे आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिराकडे एकूण २.५ लाख कोटी रुपये (जवळपास ३० अब्ज डॉलर) पेक्षा अधिक संपत्ती आहे. आयटी कंपनी विप्रो, फूड अँड ब्रेव्हरेज कंपनी नेस्लेसह देशातील अनेक कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलपेक्षा हा आकडा अधिक आहे.

आजतकमधील वृत्तानुसार, गेल्या ९० वर्षात पहिल्यांदाच मंदिराच्या संपत्तीची माहिती जाहीर करण्यात आली आहे. भगवान व्यंकटेश्वरांना समर्पित मंदिराचे व्यवस्थापक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने १९३३ मधील आपल्या स्थापनेनंतर आताच बँकेतील रोकड, सोने यांसह इतर मालमत्तेचा तपशील दिला आहे. मंदिराकडे १०.२५ टन गोल्ड डिपॉझिट, २.५ टन सोन्याचे दागिने, बँकांमध्ये जमा झालेल्या १६,००० कोटी रुपयांशिवाय, देशभरात ९६० ठिकाणी मालमत्ता आहे. ती ७,१२३ एकरांत पसरली आहे. त्या हिशोबाने तिरुपतीचे एकूण नेटवर्थ २.५ लाख कोटी रुपये आहे. गेल्या तीन वर्षाची आकडेवारी पाहिली तर यात भर पडताना दिसून येते. २०१९ मध्ये बँकेत ७.४ टन सोने होते. आता यात २.९ टनाची भर पडली आहे. २०१९ मध्ये बँकांतील गुंतवणूक १३,०२५ कोटी रुपये होती. ती आता १५,९३८ कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच यामध्ये २९,०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here