हॅम्बर्ग : सौदी धान्य संघटनेने (एसएजीओ) गुरुवारी अंदाजे ५,९५,००० टन गहू खरेदीसाठी एक आंतराराष्ट्रीय निविदा जारी केली असल्याचे युरोपातील व्यापाऱ्यांनी सांगितले. निविदेसाठी दर प्रस्ताव सादर करण्याची मुदत ११ नोव्हेंबर आहे.
सौदी अरेबियाने एप्रिल आणि जून २०२३ यांदरम्यान गहू पुरवठ्याची मागणी केली आहे. या निविदा १४ नोव्हेंबर रोजी उघडल्या जाणार आहेत. या निविदेनुसार ६०,००० आणि ५५,००० टनाच्या खेपा पाठवाव्या लागतील. १० एप्रिल ते २५ जून यादरम्यान जेद्दा, यानबू आणि दमन या तीन बंदरांमध्ये प्रत्येकी १,८०,००० टन गहू मागविण्यात आले आहेत. १० ते २५ जून पर्यंत जीजान बंदरात आणखी ५५,००० टन गहू मागविण्यात आला आहे.