कोलंबो : इथेनॉलच्या आयातीवरील करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ मंत्री रंजीत सियामबलापितिया यांनी दिली. इथेनॉलचा वापर सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी केला जातो. आणि कोविड महामारीच्या दरम्यान इथेनॉल कर कमी करण्यात आला होता.
मंत्री सियामबलापितिया यांनी सांगितले की, सरकारला या करापासून १.६ अब्ज रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. कोविड महामारीदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर उत्पादन करण्यात आले. आणि सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील करात ३० एप्रिल आणि ९ जून २०२० अशी दोन वेळा कपात करण्यात आली आहे.