कोल्हापूर : ऊस घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला लावली आग

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याला ऊस घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला शनिवारी सकाळी करवीर तालुक्यातील शिये आणि भुये यांदरम्यान अज्ञात लोकांनी आग लावली. या घटनेमुळे ऊस घेवून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. ऊस वाहतुकीच्या काही वाहनांनी आपापल्या शेताकडे परतण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगितले की, आम्ही सोमवारपासून दालमिया साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही दत्त दालमिया साखर कारखान्याला जाणारा ऊस रोखण्याचे आंदोलन करू. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यांनी जादा FRP जाहीर करण्याच्या मागणीसाठी ऊस घेवून जाणारे ट्रॅक्टर अडविण्यात आले होते. शिरोळ तालुक्यताील आंदोलनावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आणि दत्त साखर कारखान्याच्या कामगारांमध्ये हाणामारी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here