संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचा गळीत हंगाम सुरू

पैठण : येथील श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचा गळीत हंगाम २०२२-२३ चा प्रारंभ सोमवारी श्री दत्त संस्थान सावखेडाचे मठाधीपती महंत कैलासगिरी महाराज यांच्यासह पैठण तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

संगणक विभाग प्रमुख व सभासद रमेश मुळे व त्यांच्या पत्नी शारदा मुळे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी संत एकनाथ सचिन घायाळ शुगर प्रा.लि.चे चेअरमन सी. ए. सचिन घायाळ म्हणाले की, यावर्षी ३२ टन प्रती तास क्षमतेचे नवीन मेव्रन पॅनलचा बॉयलर बसविण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी चेअरमन अंकुशराव रंधे, किशोर चौहान, डॉ. भारत झारगड, सुधाकर महाराज वाघ तसेच गोपीनाना गोर्डे, संचालक अक्षय शिसोदे, विक्रम घायाळ, दत्तात्रय पाटील आमले, प्रल्हाद औटे, कचरु बोबडे, हरिभाऊ मापारी, मुक्ताबाई गोर्डे, आबासाहेब पाटील मोरे, रमेश क्षीरसागर, अशोक एरंडे, संतोष गोबरेसह सभासद, ऊस उत्पादक बागायतदार, अधिकारी व कर्मचारी कामगार व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी कदम यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here