हरदोई : टडियावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अयारी गावात ऊसाच्या शेतात पाचट पेटवताना भडकलेल्या आगीमुळे लगतच्या ऊस शेतीला आग लागली. यामध्ये सुमारे आठ शेतकऱ्यांचा ४८ एकरातील ऊस जळून खाक झाला. आग लागल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी अग्निशामल दलाला याची माहिती दिली. एक तासानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या बंबांना अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अयारी गावातील हुकूमचंद यांच्या शेतातील निम्म्या उसाची तोडणी झाली आहे. उर्वरीत ऊस पाठविला जाणार आहे. शेतात गुरुवारी सफाई सुरू असताना पाचट जाळण्यात आले. यातून आग पसरली. शेजारील सुरेंद्र नाथ यांच्या शेतातील ऊस पिक आधी जळाले. त्यानंतर संतकुमार, राधेश्याम, रामसेवक, बाबूराम, ब्रिजमोहन, सियाराम यांच्या शेतातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग लागलेली पाहून ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. तोपर्यंत या शेतकऱ्यांचा ४८ एकरातीलऊस जळाला. घटनाची माहिती मिळताच विभागीय लेखापाल संकल्प शुक्ला, राहुल कुमार यांनी घटनास्थळी पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही दिले.