पाचट जाळण्याच्या समस्येवर हवी उपाययोजना, अनेक राज्यांमध्ये जबरदस्त तणाव

सद्यस्थितीत दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये पाचट जाळण्याच्या समस्येने वातावरण तापले आहे. या राज्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, पाचट जाळणे सुरूच आहे. ड्रोनच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवले जात आहे. आर्थिक दंड आणि कायदेशीर कारवाईचे इशारे देण्यात आले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, समस्येचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कामगारांचा तुटवडा अथवा त्यांची महागडी मजुरी ही याची कारणे आहेत. जोपर्यंत यावर योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत पाचटची समस्या कायम राहील असे तज्ज्ञांचे म्हणे आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकार तसेच जबाबदार घटकांनी यासाठी योग्य पद्धतीने काम करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता असते. मात्र त्याला जेव्हा लवकर पिकांची पेरणी करायची असते तेव्हा त्यांच्याकडे दुसरा पर्याय असू शकत नाही. पंजाबमध्ये काही ठिकाणी पाचटापासून विज उत्पादनाच्या छोट्या युनिटचे काम सुरू आहे. त्या भागात पाचट जाळण्याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र, ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासोबत जोडण्याची गरज आहे. तरच यावर तोडगा निघू शकतो. पाचटाचे जैविक खाद्य तयार करणे, त्याला ठराविक किंमत देणे या गोष्टी व्हायला हव्यात. यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या संघटनांशी संयुक्तरित्या काम करण्याची गरज आहे. तरच या समस्येचे उत्तर मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here