इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मनोकामना व्यक्त करत, या दु:खाच्या काळात इंडोनेशियाच्या पाठीशी भारत ठामपणे उभा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान ट्वीट संदेशात म्हणाले;
“इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या मालमत्ता आणि जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियां प्रति मनापासून सहवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही सदिच्छा. या दु:खाच्या काळात भारत इंडोनेशियासोबत उभा आहे.”
(Source: PIB)