शेतकरी होताहेत डिजिटल फ्रेंडली, ॲपच्या माध्यमातून साखर कारखान्याशी जोडणार

कर्नाल : देशातील प्रत्येक क्षेत्र डिजिटल माध्यमातून प्रगती करीत आहे. अशाच पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही डिजिटल फ्रेंडली बनवण्याची गरज आहे. कारण भविष्यात कृषी क्षेत्र डिजिटल रुपात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना डिजिटलीकरणाशी जोडत आहेत.

कर्नाल सहकारी साखर कारखान्याकडे नोंदणी केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ‘गन्ना अॅप’ (Ganna App in Haryana) लॉन्च केले आहे.

याबाबत दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आता शेतकरी २४ तास कारखान्याशी जोडलेले राहतील. त्यांना गळीत हंगाम, आगामी कार्यक्रम, क्रशिंग यार्डची स्थिती, ऊस बिले आणि इतर विवरणाबाबत मोबाईलवर माहिती मिळेल. याशिवाय शेतकऱ्यांना या क्षेत्रातील इतर माहिती, ऊस पिकाच्या वाणांची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की यातून दलालांचे राज्य संपुष्टात येईल. गळीत हंगामात २,६५० ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याशी जोडले गेले आहेत. १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा कारखान्याचा ४७ वा हंगाम आहे.

कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की, आम्ही दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी हे ॲप लाँच केले आहे. ते डाउनलोड करून शेतकरी गळीत हंगाम, ऊस बिलांबाबतची सर्व माहिती फोनवर मिळवू शकतील. यासाठी ॲपची लिंक नोंदणीकृत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दिलेल्या पासवर्डने ते लॉगीन करू शकतील. शेतकऱ्यांना ॲप फ्रेंडली बनविण्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी डेटा आणि कारखान्यात उत्पादन आणण्यासाठी कॅलेंडर तयार केले आहे. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी रात्री मुक्कामाची सोय आहे. शेतकऱ्यांसाठी प्रती १० रुपये दराने जेवण उपलब्ध आहे. यासाठी अटल शेतकरी कामगार कँटीनतर्फे व्यवस्था केली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here