सहकारी साखर कारखाना सुरू न झाल्याने भाकियूचे धरणे आंदोलन

पुरनपूर : पुरनपूर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू न झाल्याने भाकियू अराजनैतिकच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या प्रदेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर आंदोलनकर्ते आणि कारखान्याच्या सरव्यवस्थापकांमध्ये चर्चा करण्यात आली. कारखाना सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्णय भाकियूने जाहीर केला. जिल्हाध्यक्ष मनजीत सिंह यांच्या नेतृ्त्वाखाली कार्यकर्ते कारखाना प्रदेशद्वारासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी झालेल्या सभेत मनजित सिंह यांनी सांगितले की, आधी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. नंतर अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. आता ऊस शेतात तयार आहे. मात्र, कारखाना सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांना मिळेल तेथे, मिळेल त्या किमतीला पिकाची विक्री करावी लागत आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम त्वरीत सुरू करण्याची मागणी उपस्थित कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी केली. कारखान्याच्या सरव्यवस्थापकांची शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यांनी लवकरच कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलनकर्ते शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दिनेश कुमार, रामकुमार प्रजापती, रामगोपाल, कुलवंत सिंह, तेजराम, बालकराम, जसवीर सिंह, रामपाल आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here