नवी दिल्ली : चीनमधील झिरो कोविड धोरणाच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे तेलाची मागणी घटली आहे. दुसरीकडे, जी ७ मध्ये सामील असलेले देश रशियाच्या कच्च्या तेलावर किंमत मर्यादा घालण्याचा विचार करत आहेत. अशा स्थितीत तेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चीनमधील कोविड १९च्या कठोर निर्बंधांविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे काम ठप्प झाले असून त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसू लागला आहे. चीन हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. तेथे झालेल्या निदर्शनांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. आदल्या दिवशी ब्रेंट क्रूड २.४३ डॉलर किंवा २.९ टक्क्यांनी घसरून ८१.०२ प्रति बॅरल झाले होते. एमसीएक्सवर डब्ल्यूटीआय ७१ डॉलरवर घसरला आणि क्रूड ६१०० च्या खाली घसरला. अशाप्रकारे कच्च्या तेलाने १० महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत निसान सिक्युरिटीजचे महाव्यवस्थापक हिरोयुकी किकुकावा म्हणाले की, ‘चीनमध्ये वाढत्या कोविड-19 प्रकरणांमुळे कडक निर्बंधांमुळे इंधनाच्या मागणीवर परिणाम झाला आहे.’ ते म्हणाले की डब्ल्यूटीआयची व्यापार श्रेणी ७० डॉलरवरून ७५ डॉलरपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. उत्पादनाबाबत ओपेक देशांच्या आगामी बैठकीचे निकाल आणि अमेरिकेसह जी ७ देशांनी रशियन तेलावर किंमत मर्यादा लादल्यास कच्च्या तेलाच्या किमती बाजारात अस्थिर राहू शकतात. ‘चीनमधील मागणीच्या वाढत्या चिंतेमुळे आणि तेल उत्पादकांकडून स्पष्ट संकेत नसल्यामुळे, तेल बाजारात मंदीची भावना निर्माण होत आहे.
(Source: PIB)