हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
चीनकडून साखर निर्यात कोटा मंजूर करण्यात पाकिस्तानने बाजी मारली आहे. चीनने पाकिस्तानला ३ लाख टन साखरे कोटा मंजूर केला आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे त्रस्त असलेला भारत गेल्या काही महिन्यांपासून चीनचा कोटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र, यात पाकिस्तान वरचढ ठरला आहे.
या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ‘चीन ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आम्ही चीनकडून निर्यात कोटा मंजूर होण्याची वाट पाहत आहोत.’ भारताने हा कोटा मिळवण्यासाठी खूप धडपड केली. जून २०१८मध्ये चीनमधील भारतीय दुतावासाने बीजिंगमध्ये एका विशेष परिषदेचे आयोजन केले होते. त्यात चीनमधील मोठ मोठ्या साखर रिफायनरीज् तसेच, तेथील आयातदार, व्यापारी यांनी परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे प्रतिनिधी, चीनच्या शुगर असोसिएशनचे तसेच, सीओएफसीओ शुगरचे प्रतिनिधीहीत्या परिषदेला उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१८मध्ये पहिल्यांदा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी साखरेच्या निर्याती संदर्भातच चर्चा केली होती.
भारतातील साखर हंगामाचा विचार केला तर, यंदा ७ मार्च अखेर भारतातून २२ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. जर, भारतीय साखरेला चीनची बाजारपेठ खुली झाली नाही तर, यंदा भारताची निर्यात ३० लाख टन साखरेपर्यंतच मर्यादीत राहील, असा अंदाज नाईकनवरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातून आतापर्यंत ८ लाख टन तर, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधून प्रत्येकी तीन लाख टन साखर निर्यात झाली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp