भुवनेश्वर : ग्लोबस स्पिरिट्सने ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यातील झमुजारा येथे ३०० KLPD क्षमतेचा इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना जाहीर केली आहे. याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या इथेनॉल प्लांटसोबतच विजेची गरज भागविण्यासाठी आठ मेगावॅट क्षमतेचे एक सह विजनिर्मिती प्रकल्पही स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल स्पिरिट्सच्या या प्लांटसाठी पर्यावरण मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या योजनेसाठी २०२३ मध्ये काम सुरू केले जाईल असे सांगण्यात आले.