बहराइच : जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद्र आणि पोलीस अधीक्षक प्रशांत वर्मा यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारांनी परसेंडीतील पार्ले साखर कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम २०२२२-२३ चा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याच्या गेटवर पहिल्यांदा ऊस घेवून आलेल्या बैलगाडीचेही पूजन करण्यात आले. कंदैला गावातील शेतकरी राम संवारे यांना पुष्पहार, घोंडगी देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या समारंभावेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ऊस उत्पादक शेतकरी तसेच साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा ऊस अधिकारी शैलेश कुमार मौर्य, साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल सखूजा, कारखान्याचे व्यवस्थापक अनिल यादव आदी उपस्थित होते.