पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याची तारिख जाहीर, जाणून घ्या कधी

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणारी पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सरकारने योजनेचा १२ वा हप्ता जमा केला होता. या अंतर्गत १० कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. आता दोन महिन्यांनंतर डिसेंबर महिना सुरू झाल्याने कोट्यवधी शेतकऱ्यांना १३ वा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. या योजनेतून केंद्र सरकार शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची मदत देते.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक शेतकऱ्याला तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये दिले जातात. आता पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता डिसेंबर ते मार्च यादरम्यान दिला जाणार आहे. सरकार हा हप्ता १५ ते २० डिसेंबर या काळात देण्याची तयारी करीत आहे. शेतकऱ्यांना दरवेळीप्रमाणे हा हप्ताही थेट बँक खात्यांमध्ये दिला जाणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अद्याप नोंदणी केली नसेल तर तुम्ही दोन प्रकारे नोंदणी करू शकता. योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी नोंदणी केली जाते. शेतकऱ्याला पीएम किसान योजनेसाठी जन सेवा केंद्रात संपर्क साधण्याची सुविधा आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. या योजनेच्या नव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना रेशनकार्ड सादर करणे गरजेचे आहे. रेशनकार्डची पीडीएफ कॉपी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर अलपोड करण्यास सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here