एप्रिल – नोव्हेंबर 2022 दरम्यान कोळशाचे विक्रमी उत्पादन आणि वाहतूक

एप्रिल-नोव्हेंबर 2022 या कालावधीत भारतात कोळशाचे भरीव उत्पादन झाले असून गतवर्षीच्या याच कालावधीतील 447.54 दशलक्ष टन (एमटी ) च्या, तुलनेत ते 17.13% वाढले असून 524.20 एमटी इतके झाले आहे.कोल इंडिया लिमिटेड (CIL) मधील कोळशाच्या उत्पादनात गतवर्षाच्या याच कालावधीतील 353.41 एमटी च्या तुलनेत यंदाच्या वर्षी 16.76% ची वाढ झाली असून नोव्हेंबर पर्यंत ते 412.63 एमटी इतके नोंदवले गेले आहे.

कोळसा उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, कोळसा मंत्रालयाने 141 नवीन कोळसा खाणी व्यावसायिक लिलावासाठी निश्चित केल्या आहेत आणि देशातील विविध कोळसा कंपन्यांशी नियमितपणे संपर्क साधत त्यांच्या उत्पादनावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशांतर्गत उत्पादन आणि वितरण वाढवण्यासाठी केलेल्या सर्वांगीण प्रयत्नांचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.भारत हा ऊर्जा वापरणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे आणि विजेची मागणी दरवर्षी सुमारे 4.7% वाढते.

जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पीएम-गती शक्ती योजनेअंतर्गत सर्व प्रमुख खाणींना रेल्वेमार्गाने जोडत, पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालय पावले उचलत आहे.परिणामी, एप्रिल-नोव्हेंबर 22 या कालावधीत 7.45% ची वाढ दर्शवित,एकूण 557.95 एमटी कोळश्याची वाहतूक झाली.यावरून, देशभरातील विविध क्षेत्रात झालेली कोळशाच्या वितरणाची सुस्थिर आणि कार्यक्षम स्थिती लक्षात येते.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here