कोलंबो : सेवनगला आणि पेलवट्टा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अद्याप सुरूच आहे. त्यामुळे कारखान्यांतील देखभालीचे काम ठप्प झाले आहे.
या दोन्ही साखर कारखान्याचे अध्यक्ष, जनक निलमचंद्र यांना पदावरून दूर करण्याविरोधात आणि कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात साखर कारखान्याच्या कामगारांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. कारखान्यांतील कामगारांनी शुक्रवारी, २ डिसेंबर रोजी संपाला सुरुवात केली आहे. याबाबत प्रगतिशील कर्मचारी संघाचे सचिव शिशिरा कुमारा यांनी सांगितले की, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कामगार आपली संपाची भूमिका कायम ठेवतील. दरम्यान, हे आंदोलन सुरूच राहिल्याने कारखान्यांमधील देखभाल-दुरुस्तीचे कामही ठप्प झाले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.