तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

बुलंदशहर : बाजार समिती, पुरवठा विभाग आणि वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हरियाणाला तांदूळ घेवून जाणारा ट्रक पकडला आहे. याप्रकरणी तांदळाचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली चौघा संशयितांविरोधात जीवनावश्यक अधिनियमांतर्गत चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

लाईव्ह हिंदुस्थानमधील वृत्तानुसार, अलीगढ रोडवरील एका पेट्रोल पंपावर तांदळाने भरलेला ट्रक संशयास्पदरित्या थांबल्याचे लोकांना दिसले. लोकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत पुरवठा, वितरण आणि बाजार समिती या विभागांना याची माहिती दिली. तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता बाजार समितीला मोहन लाल तथा मोहित कुमार (रा. पवित्रपुरी), ट्रकचालक शफी, क्लिन्नर तौसिफ यांच्या नावाने कागदपत्रे तयार केल्याचे आढळले. यामधील ३३० क्विंटल तांदूळ हरियाणामध्ये चिका येथील एका फर्मला पाठविण्यात येत होता. समितीच्या मलकापूर रोडवरील गोडावूनमध्ये १५२० पोती गहू आणि ४९५ पोती तांदूळ अद्याप उपलब्ध असल्याची नोंद होती. मात्र गोदाम तपासणीत १३२५ क्विंटल गहू कमी असल्याचे आढळले. त्यानंतर चौघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पुरवठा अधिकारी मिनाक्षी सिंह यांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत ही तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here