दिल्ली महानगरपालिकेत केजरीवाल यांना बहुमत, भाजप सत्तेवरुन पायउतार

नवी दिल्ली : म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले आहे. २५० प्रभागांच्या एमसीडीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला १३० जागांवर बहुमत मिळाले आहे. तर भाजपला १०७ जागांवर आघाडी मिळाली. अशा प्रकारे आम आदमी पक्षाने दिल्ली एमसीडीत गेल्या १५ वर्षांपासून कायर्रत असलेल्या भाजपला सत्तेवरून पायउतार केले आहे. यासोबतच भाजपच्या माघारीची श्रृंखलाही तोडली आहे. केजरीवाल यांच्या डबल इंजिनच्या घोषणेने कमाल केल्याचे मानले जात आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही घोषणा देत असतात.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, काँग्रेसतने ८ जागांवर विजय मिळवला. तर भाजपने ९७ जागा जिंकल्या आहेत आणि १० जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ११४ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. १६ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपला ३९ टक्के मते मिळाली असून आपने ४२ टक्के मते मिळवत सर्वोच्च स्थान पटकावले आहे. काँग्रेसची मते आपच्या पारड्यात गेली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. हीच मते केजरीवाल यांचे बलस्थान ठरल्याचे मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here