नवी दिल्ली : चलन बाजारासह इतर अनेक बाजारात आता उशिरापर्यंत व्यवहार होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी विविध बाजारांसाठी व्यवहाराचे तास वाढवले आहेत. हे विशेषतः मनी मार्केटशी संबंधित आहेत. त्यांचे व्यवस्थापन आणि नियमन आरबीआयच्या हाती आहे. याबाबत आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की आता डिमांड/नोटिस/टर्म मनी, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि मनी मार्केट कॉर्पोरेट बाँड विभागातील बाजाराचे तास वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉर्पोरेट बाँड सेगमेंट बाजारातही वेळ वाढविण्यात आली आहे.
जागरणमधील वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयानंतर कॉल/नोटिस/टर्म मनी, कॉमर्शियल पेपर, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये रेपो आणि रुपयाच्या व्याज दर डेरिव्हेटिव्हजमध्ये दीड तास जादा व्यवहार होणार आहे.
जागणमधील वृत्तानुसार, कोविड १९ च्या कालावधीत आरबीआयने एप्रिल २०२० मध्ये वेळेत बदल केला होता. आता त्यात सुधारणा करण्यात येत आहे. १२ डिसेंबरपासून ही नवी वेळ लागू होईल. त्यानुसार कॉल/नोटिस/टर्म मनी मार्केट संध्याकाळी पाच वाजता बंद होईल. तर कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉजिटचे ट्रेडिंग संध्याकाळी पाच वाजता बंद होईल. कॉर्पोरेट बॉंडसाठीही हीच वेळ आहे. सध्या कॉल/नोटिस/टर्म मनी मार्केट सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू असते. गर्व्हनमेंट सिक्युरिटी आणि रेपो मार्केट ९ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू असते. यात कोणताही बदल केला गेलेला नाही.