नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी आज, शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी इंधन दर घटवलेले नाहीत. सलग २०१ व्या दिवशीही दर स्थिर आहेत. यांदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. आज कच्चे तेल ८० डॉलर प्रती बॅरलपेक्षाही कमी दराने मिळत आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा दर ७८ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. तर ब्रेंट क्रूड थोडे वाढून आज ८५ डॉलर प्रती बॅरल दराने ट्रेड करीत आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटरने विक्री केले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेल राजस्थानमध्ये देशात सर्वात जास्त दराने मिळत आहे. गंगानगर आणि हनुमानगढ जिल्ह्यात इंधन दर सर्वाधिक आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल ११३.४८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९८.२४ रुपये प्रती लिटर आहे. तर हनुमानगढ जिल्ह्यात पेट्रोल ११२.५४ रुपये आणि डिझेल ९७.३९ रुपये दराने मिळत आहे. सर्वात स्वस्त इंधन पोर्ट ब्लेअरमध्ये मिळते. तेथे पेट्रोल ८४.१० रुपये प्रती लिटर तर डिझेल ७९.७४ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज सकाळी सहा वाजता इंधन वितरण कंपन्यांकडून बदल केला जातो. एसएमएमद्वारेही हे दर जाणून घेता येतात.