शाहाबाद : ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांकडून राज्य सरकारवर सातत्याने दबाव वाढवला जात आहे. आज, १२ डिसेंबर रोजी भारतीय किसान युनियनने (चढूनी) ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शाहाबाद साखर कारखान्याच्या मुख्य गेटसमोर शेतकऱ्यांच्या पंचायतीचे आयोजन केले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जर राज्य सरकारने ऊसाचा दर ४५० रुपये प्रती क्विंटल केला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी इशारा दिला. ते म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा हरियाणातील ऊस दर देशात सर्वाधिक असायचा. मात्र, आज हरियाणात ऊस दर सर्वात कमी आहे, असा आरोप त्यांनी केला. सध्या हरियाणातील ऊस दर ३६२ रुपये आहे. सरकारने ऊस दर वाढवून ४५० रुपये प्रती क्विंटल करावा, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने सध्याच्या ऊस गळीत हंगामात दरवाढ केली नाही, तर भाकियूच्यावतीने (चढूनी) जानेवारीत आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.