जगात श्रीमंतांची संख्या वाढत आहे. भारतातही हा आकडा सातत्याने वाढत आहे. देशातील दोन दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचा जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. मात्र वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांच्या यादीत चीन अव्वल स्थानावर आहे. यादीतील टॉप १० शहरांमध्ये त्यापैकी चार शहरांचा समावेश आहे. या जागतिक सांख्यिकी यादीत भारताची आर्थिक राजधानी मुंबई आठव्या क्रमांकावर आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील दहा अशा शहरांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक अब्जाधीश राहतात. यामध्ये चीनचे बीजिंग पहिल्या क्रमांकावर आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या १०० आहे. विशेष म्हणजे या चिनी शहरात २.३० कोटींहून अधिक आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१च्या यादीनुसार ८४.७ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात ९९ अब्जाधीश राहतात. हाँगकाँगचे नाव ८० अब्जाधिशांसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाचे मॉस्को शहर चौथ्या क्रमांकावर आहे. त्यात ७९ अब्जाधीश राहतात. चीनमधील शेनझेन हे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. या शहरात ८६ अब्जाधीश राहतात. तर सहाव्या स्थानावर शांघाय आहे. येथे ६४ अब्जाधीश आहेत. ब्रिटनचे लंडन शहर ६३ अब्जाधीशांसह सातव्या क्रमांकावर आहे. भारतातील मुंबई आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को मध्ये प्रत्येकी ४८ अब्जाधीश राहतात. दहाव्या क्रमांकावर हँगत्सवुचा समावेश आहे. या चीनमधील शहरात ४७ अब्जाधिश राहतात.