खुशखबर, आयकर मर्यादा २.५ लाखांवरून होणार ५ लाख रुपये, बजेटमध्ये बदल शक्य

नवी दिल्ली : आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याची मर्यादा २.५ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याचा लाभ आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मिळू शकेल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर नाही. ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याचा सरकार विचार करत आहे. म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला आयकर भरावा लागणार नाही. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे पाचवे, पूर्ण बजेट असेल. २०२४ साली निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीचे हे पूर्ण वर्षाचे सादर केले जाणारे बजेट आहे. एक फेब्रुवारी २०२३ रोजी हे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतील. यापूर्वी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटमध्ये बदल केला होता. त्यावेळी वैयक्तिक करदात्यांसाठी असलेली २ लाख रुपयांची मर्यादा वाढवून २.५ लाख रुपयांवरून वाढवून ५ लाख रुपये करू शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैयक्तिक करदात्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here