देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही

नवी दिल्ली  : भारतात पेट्रोल-डिझेलचे दर दीर्घकाळापासून स्थिर आहेत. सरकारी इंधन कंपन्यांकडून आज, १५ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या दरानुसार, पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व महानगरांपासून विविध राज्यांमध्ये दर जैसे थे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतरही २१ मे नंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आज तकमधील वृत्तानुसार, आज, गुरुवारी दिल्लीत पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटरने विक्री केले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी ८४.१० रुपये तर डिझेलचा दर ७९.७४ रुपये प्रती लिटर आहे. सर्व महानगरांमध्ये इंधनाचे दर जैसे थे आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here