शेतकऱ्यांना मिळणार नव्या वर्षाचे गिप्ट, शेतात जमा होणार इतके रुपये

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दर ४ महिन्यांनी दिली जाते. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत १२ हप्ते जमा झाले आहेत. नवीन वर्षाच्या गिफ्टच्या १३ वा हप्ता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दिले जावू शकतात.

आज तकमधील वृत्तानुसार, १३ व्या हप्त्यापूर्वी योजनेतील अनेक लोकांची नावे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या यादीतून वगळली जावू शकतात. ई केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना योजनेतून बाहेर केले जावू शकते. यापूर्वी बाराव्या हप्त्याच्या वेळी अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आले होते. उत्तर प्रदेशमध्ये २१ लाख लोकांना योजनेतून बाजूला करण्यात आले आहे. इतर राज्यातही अशीच स्थिती आहे.

तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर याबाबत ऑफिशिअल वेबसाइटवर जावून लाभार्थी यादीत आपले नाव पाहू शकता. जर तुम्हाला यादीत आपले नाव पाहू शकता. याबाबतच्या कोणत्याही समस्येसाठी हेल्पलाइन नंबर- १५५२६१ अथवा १८००११५५२६ (Toll Free) अथवा ०११-२३३८१०९२ वर संपर्क साधू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here