शेती करणे होणार सोपे, ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान

शेती करण्यासाठी नवनवीन तंत्राचा अवलंब केला जात आहे. शेती सहज सोपी व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने आता शेतीमध्ये ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त ४ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. त्यामुळे अल्प आणि लघू भूधारक शेतकरीही ड्रोनचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी सक्षम होणार आहेत. अशा छोट्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मशीनरी खरेदी करणे परवडणारे नाही. त्यांच्या मदतीला केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. शेतीतील नवे तंत्र वापरात यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी, एफपीओ आणि ग्रामीण उद्योगांना कस्टम हायरिंग सेंटरद्वारे ड्रोनच्या मूळ खर्चापैकी ४० टक्के अथवा जास्तीत जास्त ४ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जात आहे. पिकांमधील कीड, रोग रोखण्यासाठी त्यावर स्प्रेद्वारे फवारणी करावी लागते. ड्रोन तंत्राद्वारे एकाच वेळी खूप मोठ्या क्षेत्रात फवारणी करता येते. त्यामुळे औषध आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत करता येते. शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या खर्चातही चांगलीच कपात होऊ शकेल. पिकावर वेळीच औषध फवारणी आणि ड्रोनच्या माध्यमातून त्यावर नियंत्रणे ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. तरच पिकांवरील रोगांना रोखता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here