पाकिस्तान सरकारकडून ५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी

लाहोर : सरकारने पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (PSMA) कडून करण्यात आलेल्या दहा लाख टन मागणीऐवजी पाच लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. स्थानिक ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचा दावा सरकारने केला आहे. प्रसार माध्यमातील रिपोर्ट्सनुसार, साखर सल्लागार मंडळाने साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात केवळ १ लाख टन साखर निर्यात केली जाईल. उत्पादन मंत्रालयाने सांगितले की, दर १५ दिवसाला किमतीचा आढावा घेतला जाईल आणि साखर निर्यात केली जाईल. एकूण ५ टन साखर निर्यात केली जाणार आहे. साखर कारखानदारांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, या निर्णयामुळे मौल्यवान परकीय चलनाचा लाभ शेतकऱ्यांना होईल. सरकरच्या आश्वासनानंतर साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here