नायेजेरियातील साखर उद्योगात १० वर्षात $३ बिलियनची गुंतवणूक

अबुजा : नायजेरीयाच्या शुगर मास्टर प्लॅनच्या (NSMP) माध्यमातून गेल्या १० वर्षांमध्ये देशातील साखर उद्योगाने $ ३ बिलियनची गुंतवणूक मिळवली आहे, असे राष्ट्रीय साखर विकास परिषदेचे (NSDC) कार्यकारी सचिव जैच अदीदेजी यांनी सांगितले. Adedeji यांनी सांगितले की, साखर क्षेत्रातील पाच ऑपरेटर असे आहेत की, ज्यांनी नायजेरीया साखर मास्टर प्लॅनच्या बॅकवर्ड इंटिग्रेशन प्रोग्रॅमवर स्वाक्षरी केली आहे. या कंपन्यांमध्ये डांगोटे शुगर रिफाइनरी, बीयुए शुगर रिफाइनरी, गोल्डन शुगर रिफाइनरी, केआयए आफ्रिका ग्रुप आणि नव्या सारो आफ्रिका ग्रुपचा समावेश आहे.

सारो आफ्रिका समूह आणि नसरवा राज्य सरकार यांदरम्यान साखर योजनेसाठी एका सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमात अदीदेजी यांनी ही माहिती दिली. सारो आफ्रिका समुहाने घोषण केली आहे की, योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५,००० हेक्टर जमिनीवर ऊस उत्पादन घेतले जाईल. अदिदेजी यांनी सांगितले की, सारो आणि नसरवा राज्यादरम्यान, सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभाने राष्ट्रपती मुहम्मद बुहारींच्या विश्वासाला अधिक मजबूत केले आहे, कारण मास्टर प्लॅनचा विस्तार १० वर्षांपर्यंत करण्यात आला. सारो आफ्रिका समुहाचे कार्यकारी संचालक रशीद सरुमी यांनी सांगितले की, सारो आफ्रिका समूह नसरवा राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here