चांगल्या ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून आज मंड्या बंद आंदोलन

म्हैसूर : राज्य सरकारने लवकरात लवकर ऊसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) ४५०० रुपये प्रती टन जाहीर करावा या मागणीसाठी KRRS (Karnataka Rajya Raitha Sangha) ने आज, १९ डिसेंबर रोजी मंड्या बंदचे आवाहन केले आहे, अशी माहिती केआरआरएसचे अध्यक्ष बडागलापुरा नागेंद्र यांनी दिली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी कमी आहे. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यातून उत्पादन खर्च भागवणेही कठीण बनले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही उसाच्या योग्य एफआरपीसाठी संघर्ष करीत आहोत.

KRRS ने मंड्यामध्ये बेमुदत आंदोलन सुरू करून ४० दिवस उलटले आहेत. मात्र, राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत संवेदनाहीन आहे. त्यामुळे आज, मंड्या बंदचे आवाहन केले आहे. अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. याशिवाय, म्हैसूर, चामराजनगर, कोडागू आणि रामनगर जिल्ह्यातील शेतकरीही आंदोलनात सहभाग घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here