थकीत ऊस बिले, खते उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आपच्यावतीने निदर्शने

महराजगंज : आम आदमी पक्षाचे सिसवा विधानसभा अध्यक्ष जाहिद अली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निचलौल तहसीलसमोर निदर्शने केली. गडौरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले द्यावीत आणि शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी विविध चार मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गडौरा साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे १७ कोटी रुपये थकीत आहेत. हे पैसे तात्काळ देण्यात यावेत. सध्या शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत. दुप्पट दराने ती विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी पुरेशी खते उपलब्ध करून देण्याची गरज आहे. निचलौल विभागात ऊस वजन करण्याची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या धान्याचे वजन केले जात नाही. ज्यांचे वजन केले आहे, त्यांना बिले दिलेली नाहीत. ती तातडीने मिळावीत आणि वजनातील तुट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. आर्या, खुर्शीद, दूधनाथ, आदिल अन्सारी, रवी शंकर, अहमद, इंद्रजित, देवीदयाल, रिझवान, महेंद्र, आबिद, श्रीपत, लारी भाई, मोहन, अलाउद्दीन सत्तार, आझम, तबरेज, मंजूर, रामप्रीत, कैसेन, शाह आलम, रामनयन, जितेंद्र, राजू आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here