शेतकऱ्यांना थंडीची प्रतीक्षा, गव्हाच्या पिकावर होणार परिणाम

डिसेंबर महिन्यातील वीस दिवस उलटल्यानंतरही कडाक्याची थंडी पडलेली नाही. रब्बी पिकांमध्ये ओलसरपणा नसल्याने शेतकऱ्यांना शेतांमध्ये पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर पडण्याची शक्यता आहे. सवाई माधोपूरमध्ये डिसेंबर महिन्यातही हवामानात बदल झालेला नाही. तापमान कमी झालेले नाही. वाढते तापमान पिकांसाठी धोकादायक ठरते आहे. रब्बी पिकांसाठी जमिनीचा ओलसरपणा महत्त्वाचा असतो. तो नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावर्षी सवाई माधोपूरमध्ये २ लाख ९३ हजार हेक्टरमध्ये रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यापैकी ८० हजार हेक्टर क्षेत्रात गव्हाचे पिक आहे. थंडी नसल्याचा सर्वाधिक परिणाम या क्षेत्रावर होणार आहे. त्यामुळे गव्हाची वाढ कमी होईल. शिवाय उत्पादनावरही विपरीत परिणाम होईल. गव्हासाठी ५ ते १५ डिग्री तापमान अनुकूल असते. मात्र, माधोपूरमध्ये सध्या किमान ९ तर कमाल २८ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. याचा रब्बीच्या इतर पिकांवरही परिणाम होईल. हिवाळ्याच्या काळात पिकांना पाण्याची गरज भासते. मात्र, थंड हवामानामुळे ओसलसरपणा पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरतो असे सवाई माधोपूर कृषी विस्तार उपसंचालक रामराज मीणा यांनी सांगितले. तर हवामान विभागाने आणखी एक आठवडा थंडीची तिव्रता वाढणार नाही असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here