सरकारच्या या योजनेचा शेतकऱ्यांना दुप्पट फायदा, स्वस्तात बसवा सोलर पंप

नवी दिल्ली : भारतात शेती करणाऱ्यांसमोर सिंचन व्यवस्था नसणे ही मुख्य समस्या आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत आहे. तर नव्या तंत्राचा वापर करणे वाढत्या उत्पादन खर्चामुळे शक्य होत नाही. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने नवी योजना आणली आहे. सिचंनासाठी सोलर पंपांना प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकार पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत (PM Kusum Yojana) सोलर पंप खरदेसाठी अनुदान देत आहे. सोलर पंप खरेदीवर सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांना ५० ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. याला पंतप्रधान शेतकरी ऊर्जा सुरक्षा तथा उत्थान महाभियान याच्याशी जोडले गेले आहे. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. या अंतर्गत ५,६१४ सोलर पंप दिले जाणार आहेत. योजनेसाठी शेतकऱ्यांना तातडीने अर्ज करावा लागेल. सोलर पंपाद्वारे कमी खर्चात सिंचन करता येईल. शेतकऱ्यांना २ मेगावॅटचा सोलर प्लांट बसवावा लागेल. यापासून मिळणारी विज २५ वर्षांपर्यंत वीज विभागास विक्री करण्याची सुविधा आहे. शेतकरी शेती करण्यासह या माध्यमातून उत्पन्नही मिळवू शकतात. हरियाणा सरकारने यासाठी अधिकृत सरल वेबपोर्टल saralharyana.gov.in वर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here