हरियाणा : कमी दराने ऊस खरेदी केल्याचा साखर कारखान्यांकडून इन्कार

चंदीगढ : हरियाणातील साखर कारखान्यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून कमी दरात ऊस खरेदी केल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे. प्रसार माध्यमातील रिपोर्टनुसार, शेजारील उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकरी हरियाणातील साखर कारखान्यांना कमी दरात ऊस विक्री करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. हरियाणातील शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, यामुळे ऊस उत्पादक क्षेत्रात गव्हाच्या पेरणीस उशीर होत आहे. कारण, त्यामुळे ते आपले पिक त्वरीत विक्री करण्यात आणि पुढील पिकांची पेरणी करण्यापासून असमर्थ आहेत.

शेतकऱ्यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेशातील उसाच्या आवकेने स्थानिक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कारखान्यांशी गळीत हंगामता एसएपीवर ऊस पुरवठा करण्याचा करार केला आहे. साखर कारखाने आणि गूळ उत्पादक उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून कमी दरात ऊस खरेदी करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे आम्हाला बाँडनुसार इंटेंड मिळत नाही. यामुळे गहू पेरणीस उशीर होत आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांशी करार केला आहे. साखर कारखान्यांशी केलेल्या करारामुळे शेतकर्‍यांना त्यांचे पिक इतर कारखाने अथवा गूळ उत्पादकांना विकता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here