ऊस उत्पादकांसाठी खुशखबर, इथे फोन करा, तुमच्या समस्या सुटणार

नवी दिल्ली : भारत हा जगातील द्वितीय क्रमांकाचा ऊस उत्पादक देश आहे. येथे उसापासून निर्माण होणारी उत्पादने आणि साखर मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. देशात सर्वाधिक ऊस उत्पादन उत्तर प्रदेशात होते. तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन आणि आधुनिक सुविधांनी कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. यामधून ऊस विकास विभागात फोन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार हा हेल्पलाइन क्रमांक १८००-१२१-३२०३ आहे. यावर शेतकरी २४X७ म्हणजे कधीही फोन करून शेतीपासून ते मार्केटिंग पर्यंतच्या समस्या मांडू शकतात. त्यानंतर या कंट्रोल रुममध्ये बसलेले अनुभवी तज्ज्ञ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हेल्पलाइनला जो क्रमांक कंट्रोल रुमला जोडला गेला आहे, तेथे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा आहेत. कंट्रोल रुममध्ये कम्प्युटिंग सिस्टिम, ईपीबीएक्स, इंटरकॉम, वेब बेस्ड सॉफ्टवेअर आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. हा विभाग २४ तास सुरू राहील असे ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here