सीबीआय चौकशी करण्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

तंजावर : जिल्ह्यातील थिरुमन कुडी खासगी साखर कारखान्याशी संलग्न आंदोलनकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधीच्या कारखाना व्यवस्थापनाने बँक अधिकाऱ्यांची साटे-लोटे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर अवैध बँक कर्ज उचलण्याच्या प्रकाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत दि हिंदूने वृत्त दिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी गेल्या काही आठवड्यापासून थमीजागा करूम्बु विवसईगल संगम, स्वामीमलाईच्या बॅनरखाली आंदोलन करीत आहेत. साखर कारखान्याच्या आधीच्या प्रशासनाने त्यांच्यावर लादलेले ३०० कोटी रुपयांचे ओझे हटवावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कॉर्पोरेट दिवाळखोरी अधिनियम प्रक्रियेद्वारे २०१६मध्ये साखर कारखान्याच्या पूर्वीच्या व्यवस्थापनाला दिलेल्या सुमारे १६० कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांच्या एका गटाने एनसीएलटीकडे याचिका दाखल केली आहे. एनसीएलटीने यावर्षी मे महिन्यात १४५ कोटी रुपयांहून अधिक खर्चास मंजुरी अथवा नव्या प्रशासनाकडून सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यांच्याकडे पुडुकोट्टई जिल्ह्यात आसवानी आणि अल्‍कोहल युनिटचे व्यवस्थापन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here